700 वर्षांची परंपरा असलेली सातपुड्यातील 'आदिवासीं'ची होळी | 700-year-old traditional Holi of Adivasis of Maharasthra

Rajwadi Holi


आदिवासी संस्कृतीत होळी सण मोठा मानला जातो. त्यातही नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी होळीचा जल्लोष हा सर्वदूर परिचीत झाला आहे.  जिल्ह्यातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगामधील काठी या गावात 700 वर्षांपासूनची परंपरा असलेली 'राजवाडी' होळी प्रसिद्ध आहे. 



Tribal People From all over Satpura Hill






या होळीला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून पर्यटक, फोटोग्राफर, फिल्ममेकर येथे येत असतात. 







या होळीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे होळीसाठी लागणारा उंच बांबू हा गुजरातच्या जंगलांतून आणण्यात येतो.  या बांबूच्या शेंड्यावर खोबरे, पाच भाकरी, हारकंगन, झाडाची पाने यांनी सजवला जातो. 





होळीचा बांबू उभारण्यासाठी खड्डा सामुहीकपणे खोदण्याची प्रथा आहे. यासाठी प्रत्येक आदिवासी बांधव होळीच्या ठिकाणी जावून मुठभर माती काढतो.  हा बांबू ठराविक दिशेला पडल्यास लाभ होत असल्याचा येथील आदिवासी बांधवांचा समज आहे. 



Tribal attire



Tribal attire



Tribal attire



Tribal attire



Tribal attire




Tribal attire




Tribal attire




Tribal attire




Tribal attire





Tribal attire

या होळीचे आणखी खास वैशिष्ट्ये असे की होळीसाठी नवस ठेवून खास बुध्या, बावा, घेर, मोरख्या, कहानडोखा, मोडवी, शिकारी आदि प्रकारच्या पारंपरिक होळीच्या प्रतिकांचा पेहराव येथील आदिवासी करतात. यासाठी त्यांना होळीच्या पाच दिवस आधीपासून ब्रम्हचर्यत्व धारण करावे लागते. खाट अथवा पलंगावर न झोपता जमिनीवर झोपूनच या कार्यकाळात होळीला वंदना दिली जाते. या होळीसाठी विविध रुप धारण केलेले आदिवासी काठी होळीनंतर तब्बल आठ ठिकाणची होळी पायी जाऊन आपला नवस फेडून होलिकात्सव साजरा करतात.  या होळीचे मुख्य आकर्षण म्हणजे वैशिष्ट्ये म्हणजे सलग बारा तास न थकता आदिवासी पुरुष वेगवेगळा पेहराव करीत ढोल च्या तावावार एकाच ताल आणि सुरात नृत्य करतात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'अमरत्त्व' प्राप्त असलेले वारंगळ येथील शंकराचे 'रामप्पा' मंदिर...

श्रीशैलम भटकंती

'या'च किल्ल्यातून जगाला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता...