पोस्ट्स

Featured post

700 वर्षांची परंपरा असलेली सातपुड्यातील 'आदिवासीं'ची होळी | 700-year-old traditional Holi of Adivasis of Maharasthra

इमेज
Rajwadi Holi आदिवासी संस्कृतीत होळी सण मोठा मानला जातो. त्यातही नंदुरबार जिल्ह्य़ातील आदिवासी होळीचा जल्लोष हा सर्वदूर परिचीत झाला आहे.  जिल्ह्यातील सातपुडय़ाच्या पर्वतरांगामधील काठी या गावात 700 वर्षांपासूनची परंपरा असलेली 'राजवाडी' होळी प्रसिद्ध आहे.  Tribal People From all over Satpura Hill या होळीला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून पर्यटक, फोटोग्राफर, फिल्ममेकर येथे येत असतात.  या होळीचे खास वैशिष्ट्ये म्हणजे होळीसाठी लागणारा उंच बांबू हा गुजरातच्या जंगलांतून आणण्यात येतो.  या बांबूच्या शेंड्यावर खोबरे, पाच भाकरी, हारकंगन, झाडाची पाने यांनी सजवला जातो.  होळीचा बांबू उभारण्यासाठी खड्डा सामुहीकपणे खोदण्याची प्रथा आहे. यासाठी प्रत्येक आदिवासी बांधव होळीच्या ठिकाणी जावून मुठभर माती काढतो.  हा बांबू ठराविक दिशेला पडल्यास लाभ होत असल्याचा येथील आदिवासी बांधवांचा समज आहे.  Tribal attire Tribal attire Tribal attire Tribal attire Tribal attire Tribal attire

'या'च किल्ल्यातून जगाला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता...

इमेज
भारत एक असा देश ज्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा यांनी साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षूण घेतले आहे. जगातील लोकांना भारतातील प्रत्येक गोष्टींचे आकर्षण आहे मग त्यात आग्र्याचा ताजमहाल असो, किंवा हैदराबादचा चारमिनार, अगदी छोट्या गोष्टींचे सुद्धा मग त्यात मुंबईचा वडापाव असो किंवा नागपूरची संत्री. तसे बघायला गेले तर भारताच्या सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळी सांस्कृतिक परंपरा पहायला मिळते. त्यामूळे या सर्वांमध्ये काहीना काही नविन पहायला मिळणारच... आज मी तुम्हाला अशाच एका पर्यटन ठिकाणाबद्दल सांगणार आहे जे की, त्याच्या नवाबी संस्कृतीसाठी ओळखले जाते आणि महत्त्वाचे म्हणजे  तिथूनच जगाला सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक असलेला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता . आज मी सांगणार आहे हैदराबादच्या 'गोवळकोंडा' या किल्ल्याबद्दल, चला तर मग... गोवळकोंडा किल्ला भारताच्या तेलंगणा राज्यात हैदराबादच्या दक्षिण दिशेला ११ किलोमीटर अंतरावर 'गोवळकोंडा' किल्ला आहे. हा किल्ला आपल्या मौल्यवान खजाने, रहस्यमयी गुहा आणि भुयारांसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी गोवळकोंडा येथील खाणीत 'कोहिनूर

श्रीशैलम भटकंती

इमेज
शहरातील रोजच्या जगण्याला कंटाळले आहात ? तिथली प्रदूषित हवा, गाड्यांचा आवाज, माणसांची गर्दी, तीच-ती ठिकाणे या सर्वांपासून कुठेतरी दूर जायचंय ? पण नक्की जायचं तरी कुठे ? जिथे माणसांची गर्दी नसावी, दृष्टी जाईल तिथपर्यंत निसर्गाचे सानिध्य असायला हवे, जिथे हिरव्यागार झाडांनी बहरलेल्या डोंगरांच्या उंचच उंच रांगा, त्या डोंगरांच्या कड्यांवरून वाहणारे झरे, आणि शेवटी त्या झऱ्यांना सोबत घेऊन वाहणारी नदी... चला तर मित्रांनो, कृष्णा नदीच्या काठावर या सर्व गोष्टी अनुभवायला, निसर्गाचे चमत्कार बघायला, निसर्ग काय असतो ते जाणून घ्यायला... आज आपण बघणार आहोत, हैदराबादपासून २३२ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून १३४५ फूट उंचीवर कुर्नूल जिल्ह्यातील नल्लामलाई डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्रीशैलम आणि जवळपासची पर्यटनस्थळे. श्रीशैलम हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही गिर्यारोहण, ट्रेकिंग, जंगल सफारी, नौकाविहार आणि बरेच अनुभव एका ठिकाणी घेऊ शकता. हे ठिकाण धार्मिक स्थळ आणि निसर्गरम्य ठिकाणांचे परिपूर्ण मिश्रण आहे. धार्मिक ठिकाणांमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले मल्लिकार्जुनाचे मंदिर तर निसर्गरम्य ठिकाणांमध्ये नल

'अमरत्त्व' प्राप्त असलेले वारंगळ येथील शंकराचे 'रामप्पा' मंदिर...

इमेज
रामाप्पा मंदिर   भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आणि इसवी सन १२१३ पासून आपल्या कलात्मक, अद्वितीय सुंदरता आणि भव्यतेने सर्वांना निरुत्तर करणारे वारंगळचे 'रामप्पा मंदिर'. हे मंदिर त्याच्या ऐतिहासिक समृद्धी आणि वास्तू गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. या मंदिराच्या सभोवताली असलेले निसर्गसौंदर्य, तेथील तलाव या गोष्टी नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात. आज आपण या मंदिराचा प्राचीन इतिहास, त्याची कलात्मकता आणि  सौंदर्य याविषयी जाणून घेणार आहोत... चला तर बघूया रामप्पा मंदिर... हैदराबादपासून १६० किमी आणि वारंगळहून साधारण ६७ किमी अंतरावर मुलुग तालुक्यात पालमपेट या गाववस्तीच्या कडेला हे  शंकराचे 'रामप्पा मंदिर' त्याच्या ऐतिहासिक समृद्धी आणि वास्तू गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिराभोवतालच्या परिसरातील हिरवीगार झाडे आणि सभोवतालचे उंच डोंगर हे सर्वच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे मंदिर आहे शंकराचे मग याला रामप्पा मंदिर का म्हणतात ? तर या मंदिराची माहीती सांगताना मंदिरातील गाईड व्यंकटेश ताडाबोईना सांगतात की... इसवी सन १२१३ या काळात आंध्र प्रदेशातील वारंगळ येथे क