पोस्ट्स

ancient places लेबलसह पोस्ट दाखवत आहे

'या'च किल्ल्यातून जगाला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता...

इमेज
भारत एक असा देश ज्याची समृद्ध संस्कृती आणि वारसा यांनी साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे आकर्षूण घेतले आहे. जगातील लोकांना भारतातील प्रत्येक गोष्टींचे आकर्षण आहे मग त्यात आग्र्याचा ताजमहाल असो, किंवा हैदराबादचा चारमिनार, अगदी छोट्या गोष्टींचे सुद्धा मग त्यात मुंबईचा वडापाव असो किंवा नागपूरची संत्री. तसे बघायला गेले तर भारताच्या सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळी सांस्कृतिक परंपरा पहायला मिळते. त्यामूळे या सर्वांमध्ये काहीना काही नविन पहायला मिळणारच... आज मी तुम्हाला अशाच एका पर्यटन ठिकाणाबद्दल सांगणार आहे जे की, त्याच्या नवाबी संस्कृतीसाठी ओळखले जाते आणि महत्त्वाचे म्हणजे  तिथूनच जगाला सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक असलेला 'कोहिनूर हिरा' मिळाला होता . आज मी सांगणार आहे हैदराबादच्या 'गोवळकोंडा' या किल्ल्याबद्दल, चला तर मग... गोवळकोंडा किल्ला भारताच्या तेलंगणा राज्यात हैदराबादच्या दक्षिण दिशेला ११ किलोमीटर अंतरावर 'गोवळकोंडा' किल्ला आहे. हा किल्ला आपल्या मौल्यवान खजाने, रहस्यमयी गुहा आणि भुयारांसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे चार हजार वर्षांपूर्वी गोवळकोंडा येथील खाणीत 'कोहिनूर ...