श्रीशैलम भटकंती
शहरातील रोजच्या जगण्याला कंटाळले आहात ? तिथली प्रदूषित हवा, गाड्यांचा आवाज, माणसांची गर्दी, तीच-ती ठिकाणे या सर्वांपासून कुठेतरी दूर जायचंय ? पण नक्की जायचं तरी कुठे ? जिथे माणसांची गर्दी नसावी, दृष्टी जाईल तिथपर्यंत निसर्गाचे सानिध्य असायला हवे, जिथे हिरव्यागार झाडांनी बहरलेल्या डोंगरांच्या उंचच उंच रांगा, त्या डोंगरांच्या कड्यांवरून वाहणारे झरे, आणि शेवटी त्या झऱ्यांना सोबत घेऊन वाहणारी नदी... चला तर मित्रांनो, कृष्णा नदीच्या काठावर या सर्व गोष्टी अनुभवायला, निसर्गाचे चमत्कार बघायला, निसर्ग काय असतो ते जाणून घ्यायला... आज आपण बघणार आहोत, हैदराबादपासून २३२ किलोमीटर अंतरावर समुद्रसपाटीपासून १३४५ फूट उंचीवर कुर्नूल जिल्ह्यातील नल्लामलाई डोंगररांगांच्या कुशीत वसलेले श्रीशैलम आणि जवळपासची पर्यटनस्थळे. श्रीशैलम हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही गिर्यारोहण, ट्रेकिंग, जंगल सफारी, नौकाविहार आणि बरेच अनुभव एका ठिकाणी घेऊ शकता. हे ठिकाण धार्मिक स्थळ आणि निसर्गरम्य ठिकाणांचे परिपूर्ण मिश्रण आहे. धार्मिक ठिकाणांमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले मल्लिकार्जुनाचे मंदिर तर निसर्गरम्य ठिकाणांमध्ये नल...